SHIPPUR GRAMPANCHAYAT
शिप्पूर ग्रामपंचायत : शिप्पूर तर्फ नेसरी / हेळेवाडी हे कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील एक सुंदर गाव आहे. गावाला लागूनच पुढे एक छोटीशी वस्ती आहे, ते हेळेवाडी हे गाव. पण हे गावदेखील शिप्प्पूर मध्येच येत असल्यामुळे व नेसरी शिप्पूरपासून अगदी काहीच अंतरावर असल्यामुळे या गावाला शिप्पूर तर्फ नेसरी / हेळेवाडी असे म्हणतात. गावचे वैशिष्ट म्हणजे गावाला लाभलेला निसर्ग , लोकांचे राहणीमान व उच्च शैक्षणीक स्तर अशी अनेक वैशिष्टे आहेत. कार्यकारी मंडळ : सरपंच - सौ. राजश्री शिवराज गुरबे उपसरपंच - श्री. अनिल कृष्णा शिखरे सदस्य - श्री. यल्लापा सिडाम नाईक श्री. निंगाप्पा भिमा कांबळे सौ. लता चंद्रकांत गाडे सौ. अलका लक्ष्मण पाटील सौ. माया भैरू आंबेकर ग्रामसेवक - सौ. कविता अमर कोकीतकर ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना : गावात एक गाव एक गणपती योजना राबविण्यात आली. पर्यावरण ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत गावात सार्वजनिक ठिकाणी वृक्षलागवड केली, गावातील ग्रामस्थांना ग्राम पंचायतमार्फत मोफत झाडे वाटप करण्यात आली. शासनाच...