About Gadhinglaj

आमचं गडहिंग्लज : कोल्हापूर जिल्हाच्या दक्षिण भागातील तालुका म्हणजे गडहिंग्लज. महाराष्ट्र कर्नाटकाच्या हद्दीवर वसलेल्या आमच्या गडहिंग्लजात गूळ, भुईमूग व मिरचीची मोठी बाजारपेठ प्रसिद्ध आहे. जवळचं हरळी येथे साखर कारखाना व तेलगिरणी आहे. गडहिंग्लजचे नाते व्यापाराच्या माध्यमातुन कोकणाशीही घट्ट जुळले आहे गडहिंग्लजमधून कोकणात प्रवेश करताना येथील पर्यटन न्याहाळण्याची संधी पर्यटकांना आहे. ऐतिहासिक वारसा : छातिचा कोट करून इतिहासाची साक्ष देणारा आणि शिवछत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला सामनागड येथे आहे. सांस्कृतिक वारसा : शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा केलेले पू . साने गुरूजी मोफत वाचनालय गडहिंग्लजमध्ये आहे. तर साहित्य अकादमी पुरस्कार विजेते व जेष्ठ साहित्यिक डॉ . राजन गवस यांचे मुळ गाव करंबळी हे आहे. गडहिंग्लजमधली नाट्यसंस्कृती सर्वदूर पोचली आहे. भडगाव , गडहिंग्लज , करंबळी, कडगाव परिसरात प्रसिद्ध मराठी चित्रपट जोगवा, सत्वपरिक्षा, देवघर यांचे चित्रीकरण झाले आहे. सामनागड : हा किल्ला मुळ ' भीमसासगिरी ' या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे. समुद्रसपाटीपासुन उंची 2972 ...