Senapati Prataprao Gujar Smarak

सरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक :
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील ‘नेसरी’ हे गाव मराठी माणसाच्या मनात पराक्रमाचे स्फुल्लिंग चेतवणारे गाव आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती ‘प्रतापराव गुर्जर’ यांची समाधी आहे.  गडहिंग्लजच्या सुप्रसिध्द सामानगडापासून सुमारे 20 कि.मी. अंतरावर महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाच्या परंपरेचे मानकरी, स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या बलिदानाने पवित्र झालेले धारातीर्थ आणि त्या पावन भूमीवर प्रतापराव गुर्जर यांच्या शौर्याची साक्ष देणारे स्मारक उभे आहे. इ.स. 1674 मध्ये आदिलशाही सरदार बेहलोल खानाच्या 20 हजारांच्या फौजेवर अवघ्या सहा स्वारानिशी मराठय़ांचे खुद्द सरसेनापती वेडय़ासारखे तुटून पडले. इतिहासातील एक अत्यंत विषम युध्द या परिसरात घडले. याच बेहलोल खानाला युध्दात हरवल्यानंतर सोडून दिल्याबद्दल छत्रपतींनी सेनापतींना खरमरीत पत्र लिहिले.

‘गनिमास गर्दीस मिळविल्याखेरीज आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका’ असे त्या पत्रात लिहिले होते. हे पत्र सरसेनापतींना मिळाले तेव्हा ते सहा स्वारांनिशी टेहळणीवर होते. आपली चूक कळून आल्यानंतर प्रतापराव केवळ सहा सरदारांसह, बहलोलखानाच्या सैन्यावर त्वेषाने चालून गेले. हे लढाई नेसरी गावातील खिंडीत झाली. बेभान होवून सहा स्वारानिशी प्रतापरावांनी खानाच्या हजारोंच्या सैन्यावर चाल केली व हौतात्म्य पत्करले. धन्य ते वीर, धन्य त्यांची ती स्वामीनिष्ठा, असे छत्रपतींच्या शब्दाखातर जीव ओवाळून टाकणारे वीर होते म्हणूनच स्वराज्य उभे राहिले. सात ढाली व सात तलवारी यांच्या प्रतिकृती वापरून बांधलेले हे प्रेरणादायी स्मारक आहे.
‘म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात.. या कुसुमाग्रजांच्या वीररसातील कवितेचा प्रत्यय घेत प्रत्येक शिवप्रेमींनी आवर्जून पाहावे.

वेडात मराठी वीर दौडले सात…
आठवा तो इतिहास, जागवा तो पराक्रम, स्वराज्यासाठी वीरांनी केलेल्या अंगावर शहारे आणणारे पराक्रम करून आपणास स्वातंत्र मिळवून दिले. त्यांचा या पराक्रमामुळेच आज आपण गुण्यागोविंदाने जगत आहोत. अशा या विरांना अभिवादन करायला हवेच. तो इतिहास जाग ठेवण्यासाठी अनेक इतिहासप्रेमी पर्यटक अशा स्थळांना भेटी देतात. तो इतिहास जाणून घेतात. नेसरी येथे प्रतापराव गुर्जर यांची स्मारक आहे या स्मारकांला अनेकजण भेट देतात.

Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj