SHIPPUR GRAMPANCHAYAT

शिप्पूर ग्रामपंचायत :
शिप्पूर तर्फ नेसरी / हेळेवाडी हे कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील एक सुंदर गाव  आहे. गावाला लागूनच पुढे एक छोटीशी वस्ती आहे, ते हेळेवाडी हे गाव. पण हे गावदेखील शिप्प्पूर मध्येच येत असल्यामुळे व नेसरी शिप्पूरपासून अगदी काहीच अंतरावर असल्यामुळे या गावाला शिप्पूर तर्फ नेसरी / हेळेवाडी असे म्हणतात. गावचे वैशिष्‍ट म्‍हणजे गावाला लाभलेला निसर्ग, लोकांचे राहणीमान व उच्‍च शैक्षणीक स्‍तर अशी अनेक वैशिष्‍टे आहेत. 

कार्यकारी मंडळ :
सरपंच -
सौ. राजश्री शिवराज गुरबे

उपसरपंच -
श्री. अनिल कृष्णा शिखरे 

सदस्य -
श्री. यल्लापा सिडाम नाईक
श्री. निंगाप्पा भिमा कांबळे
सौ. लता चंद्रकांत गाडे
सौ. अलका लक्ष्मण पाटील
सौ. माया भैरू आंबेकर

ग्रामसेवक -
सौ. कविता अमर कोकीतकर 


ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना :
  • गावात एक गाव एक गणपती योजना राबविण्यात आली.
  • पर्यावरण ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत गावात सार्वजनिक ठिकाणी वृक्षलागवड केली, गावातील ग्रामस्थांना ग्राम पंचायतमार्फत मोफत झाडे वाटप करण्यात आली.
  • शासनाच्या कृषी योजनेतून लाभार्थी निवड करून कृषी उपक्रम राबविण्यात आले.
  • पाणलोट योजनेतून शेतकऱ्यांच्या शेतात वैयक्तिक कामे करणेत आली, पाईपलाईन टाकणेत आली.
  • प्लास्टिक पिशवी वापरावर बंदी साठी लोकांना कापडी पिशवी ग्रामपंचायतमार्फत वाटप करणेत आल्या.
  • गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करणेत आले.
  • गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करणेत आली.

 ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार :
  • तंटामुक्त गाव पुरस्कार
  • हागणदारी मुक्त गाव पुरस्कार 



संपर्क साधा :
शिप्पूर तर्फ नेसरी / हेळेवाडी ग्रामपंचायत
पत्ता : मु.पो. शिप्पूर तर्फ नेसरी / हेळेवाडी
तालुका - गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर
महाराष्ट्र 416504
फोन नंबर : 02327 – 200132 , 9075533192 

Shippur Website
http://shippur.gadhinglaj.org


Popular posts from this blog

Dongari certificate

Senapati Prataprao Gujar Smarak

निसर्ग मानवाचा सखा, सोबती !