माणुसकी म्हणजे काय?
माणुसकी म्हणजे प्रेम , माणुसकी म्हणजे जाणीव , माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर , समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर , माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणुस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात. दैनंदिन जीवन जगत असतांना या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात असे काही शब्द आहेत की जे बोलताना त्याची घनता , त्याचा खोल गेलेला अर्थ पटकन लक्षात येत नाही पण ते शब्द असे काही कटू अनूभव शिकवून जातात की काहींचा अर्थ जेवढा लावु तेवढा लागतो , जेवढा ताणू तेवढा ताणतो , जेवढा मनावर घेऊ तेवढा घेता येतो आणि एकदा का त्या शब्दाने किंवा त्या शब्दाच्या अर्थाने आपल्या मनाचा ताबा घेतला ना की मग आपण त्या शब्दाप्रमाणे किंवा त्या शब्दाच्या अर्थाप्रमाणे समोरच्या व्यक्तीसोबत वावरतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. कधी ती लगेच पहायला मिळते तर कधी कधी ती शोधावी लागते. कधी समोरच्या व्यक्तीच्या वागण्यातून तर कधी बोलण्यातून त्याची ओळख होत असते. प्रत्येक शब्द कितीही छोटा वा मोठा असो त्या शब्दाच्या गर्भितार्थावरून त्या शब्दाची जाडी-र...