वृक्षारोपण 2016
आज जगात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत असून त्यामुळे पाऊस अनियमित झाला आहे. पर्यावरणाचे संवर्धन करणे आवश्यक आहे परंतु केवळ झाडे लावून संवर्धन होत नाही. 'झाडे लावा झाडे जगवा' हा मूलमंत्र जपला पाहिजे. गेल्या वर्षी सगळीकडे दुष्काळ होता, त्याची झळ संपूर्ण महाराष्ट्राला बसली आहे. लातूर, विदर्भला तर रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला. वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. बदलत्या निसर्गाने मानवावर विचार करण्याची वेळ आणलीय. आपण एकीकडे कल्पनेच्या पलीकडे गगनभरारी घेतली, प्रगती साध्य केली; परंतु आपल्या कृतीने पर्यावरणाचा क्षय होतोय याकडे मात्र दुर्लक्ष केले. याचेच परिणाम आज आपण पाहत आहोत. मानवाने आपल्या अतिरेकी महत्त्वाकांक्षेसाठी सिमेंटची जंगले बसविले. मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली. याच्याच परिणामी ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आज जगाला भेडसावत आहे. वातावरण बदलामुळे पावसाची अनिश्चितता वाढली आहे.
" कावळा करतो काव काव,
म्हणतो माणसा, एक तरी झाड लाव "
!!-वृक्ष संवर्धन ही सध्याची व भविष्याची गरज आहे -!!