शब्द

    आज वाचकांशी संवाद साधण्याची संधी मला मिळतेय याच शब्दांच्या माध्यमातून. दोन अक्षर शब्द. पण त्याचे सामर्थ्य किती मोठे. किती रुपं या शब्दांची. काही कठोरकाही मृदूकाही जखमा करणारेकाही जखमा भरणारे. काही दु:खावर हळूवार फुंकर घालणारेकधी मायेने गोंजारणारेकधी निराशेच्या गर्तेत ढकलणारेकधी मनाला उभारी देणारेकधी हास्याची कारंजी फुलवणारेकधी सांत्वन करणारे. मन मोकळं करताना लागतात ते शब्दच. लहान बाळाशी बोलताना बोबडे होणारे तर याच बाळाला शिस्त लावताना कठोर होणारे. शब्दांची रुपं तरी किती !
           याच शब्दांची कधी कविता होतेकधी कथातर कधी कादंबरी. प्रत्येक शब्दाची अनुभूती वेगळी. परिणाम वेगळा. क्रांती घडवणारे जोशपुर्ण शब्दअन्यायाविरुध्द लढा देणारे जळजळीत शब्दवाट चुकलेल्याला दिशा दाखवणारे प्रकाशाने झळाळणारे शब्द. आजीचे अनुभवी शब्द. प्रेम व्यक्त करणारे शब्द. राग व्यक्त करणारेही शब्दच. शब्दांशी इमान राखणारीशब्द पाळणारी आपण माणसं याच शब्दाला नेहमी जागतो का?
ओंकारात उत्पन्न झालो नाद
नाद निनादात स्वर स्पंदन
श्वासा गुंजनात निर्माण झालो उच्चार
आणि सहज प्रकट झाले शब्द
शब्द आकारले
प्रत्येक शब्दात ब्रह्मांडाचो अर्थ
अनमोल शब्द
असे हे अद्‌भुत शब्दब्रह्म्‌

          असे हे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटणारे शब्द. आयुष्य उजळून टाकणारे शब्द आणि आयुष्य उधळून टाकणारेही शब्दच. काही मायेने ओथंबलेले शब्द तर काही मायेचा लवलेशही नसलेले कोरडे शब्द. शब्द हा फक्त दोनच अक्षरी शब्द पण त्याचे अर्थ किती अनेक आहेत. जर शब्दच नसते तर माणूस आपले मत, भावना , आपल्याला एकाद्याच्या बद्दल वाटणारे प्रेम हे काहीच माणसाला व्यक्त करता आल नसत. आपण आपल्या नेहमीच्या आयुष्यात सहजच बोलताना बालतो कि, शब्द जपून वापर म्हणजे शब्दातून जसे प्रेम व्यक्त केले जाते. तसेच क्रोध, तिरस्कार हि व्यक्त केले जातात. म्हणूनच जीवनामध्ये शब्दांना खूप महत्व आहे.












Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj