आयुष्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन .


            आयुष्य बदलत असते, बदलावे लागेल या जीवनसत्वाप्रमाणे श्रीमदभगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे -
                         " उपभोग्य वस्तुविषयी अधिक विचार केला म्हणजे माणसाच्या मनात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे वासनेचा उदय होतो आणि वासना क्रोधाला जन्म देते. क्रोधामुळे मोह उत्पन्न होत. मोहामुळे स्मृती सारासार विवेक नाहीसा होतो. विवेक नाहीसा झाल्याने मनुष्याचा सर्वनाश ओढवतो."
ज्याप्रमाणे कापराची ज्योत उजळून जळून, संपून जात. "मी सुंदर होते" हे सांगण्यासही ती मागे उरत नाही, त्याचप्रमाणे ज्ञानप्रकाशाचा चमत्कारही असाच आहे, पण याच ज्ञानाने आजची भावी पिढी बिघडली का घडली हा अभ्यासाचाच विषय ठरावा.
              तपोबलाने सर्व काही साध्य होते. 'तप' म्हणजेच ज्ञानपूर्ण प्रदीर्घ प्रयत्न होत. तब्बल साडेसहाशेहून अधिक प्रयोग करणाऱ्या एडिसनमुळे विद्युतदीपाचा शोध लागला पण इतके प्रयोग करताना तो कंटाळला नाही. मला हे जमणारच नाही म्हणून त्याने आपला प्रयोग थांबावला नाही. अखेरीस त्याची तपश्चर्या फळाला आली.प्रदीर्घ प्रयत्नाने मानव कोठेही जाऊन पोहचतो. हीबाब लक्षणीय आहे. आज जगामध्ये सगळीकडे स्पर्धा आहे. अडचणींतून वाट काढावीलागत आहे, पण युवापिढीच्या लक्षात असू द्या की,-------------यशाच्या सर्वोच्च पायरीवर कधीच गर्दी नसते, कारण यशाच्या उत्तुंग शिखरापर्यत पोहोचणारे फारच थोडे असतात की, जे उठत,पडत, ठेचकाळत, धडपडत तिथपर्यंत पोहचून अडीअडचणींशी संघार्षांशी सामना करून यशाच्या शिखरावर ठामपणे उभे असतात. उदाहरणार्थ - एका गरीब, दरिद्रीकुटुंबात जन्मलेला अब्राहिम लिंकन झोपडीत राहणाऱ्या मजुराच्या पोटी जन्माला आला, पण तोच जर एखाद्या कोट्याधीशाच्यापोटी जन्माला आला असता तर कॉलेजात जाऊन घरचा व्यवसाय सांभाळत बसला असता. स्वत: संघर्ष करून जगलेला अब्राहिम लिंकन अमेरीकेचा अध्यक्ष कधीच झाला नसता, ना ही त्याला निग्रो गुलामांची दु:खे समजली असती.
            राजकीय नेत्याच्या मुलानं नेताच बनयाचं, चित्रतारकेच्या मुलीनं अभिनेत्रीच बनायचं, उद्योगपतीच्या मुलानं आणखीनच मोठा उद्योगपती व्हायचं हे जे पारंपारिक सुरु आहे हे सार आता थांबवून शेतकऱ्याची मुलगी शास्त्रज्ञ, शिपायाचा मुलगा प्राध्यापक, कामगाराची मुलगी संचालक, वॉचमनचा मुलगा उद्योजक कसा होईल हे पाहिलं पाहिजे, अशा शक्यता प्रत्यक्षात आणावयास राजकीय, आर्थिक व सामाजिक व्यवस्था निर्माण करायला हवी आणि हे ही सर्व आमच्या युवापिढीने परिवर्तनातूनच घडवून आणावयास हवे इतकेच नव्हे तर आज व्यसनांमध्ये अडकलेल्या नव्या पिढीला हे ही समजले पाहिजे की व्यसने विकत घेता येतात, पण .... संस्कार विकत घेता येत नाहीत. ” ज्याप्रमाणे लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचा स्वत: चा गंजच त्याला नष्ट करू शकतो. त्याप्रमाणेच आजच्या युवापिढीला त्यांची व्यसनाधीनताच आत्मविश्वासाची उणीव, ‘ ‘इगो’ नष्ट करत आहेत. या साऱ्यामुळे आजचा युवक भरकटल्यासारखा वागतोय. तर दुसऱ्या बाजूला गेली दोन दशके जगावर राज्य करणारं इंटरनेट हे माध्यम वैश्विक घडामोडींची माहिती एका क्षणात आपल्यासमोर ठेवतं. आज कॅलिफोर्निया आणि इजिप्त येथे दोन सुसज्ज ‘डिजिटल वाचनालयांची’ उभारणी करण्यात आली आहे. जग जवळ आलंय पण माणसा-माणसातील अंतर मात्र वाढतंच चाललंय. जगातील उपलब्ध ज्ञान हे अखिल मानव जातीच्या भल्यासाठीच आहे. त्याचा योग्य प्रकारे  वापर केला गेला तर दुष्परिणामातून होणारे अतोनात नुकसान टळू शकते. म्हणूनच घडवायचं का बिघडवायचं हे युवा पीढीनं ठरवलं तर त्यांना समजेल की सकारात्मकतेकडे जाण्याचा मार्ग ज्ञानाच्या खुलेपणाने झालेल्या आदान-प्रदानातून येईल हे मात्र खरे.

                     
                                                                    लेखक - प्रा. व्ही.एन.वीरकर मॅडम

Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj