मैत्री म्हणजे एक अतूट बंधन

            मित्र म्हणजे कोण असतं असं म्हणण्यापेक्षा मित्र कोण नसतो हे विचारायला पाहिजे. मित्र म्हणजे आई,, बहिण,, पत्नी,, शेजारी व शत्रुही असतो कारण एक सच्चा मित्र या सगळ्या भुमिका पार पाडतो. तुम्ही म्हणाल की मित्र शत्रु कसा असू शकतो, तर आपला मित्र चुकत असेल तर खरा मित्र प्रसंगी त्याचा विरोध करुन परिणामी शत्रु बनुन आपल्या मित्राच्या हिताचे रक्षण करतो. मित्र म्हणजे जणू एक परिस असतो जो आपल्या स्पर्शाने मित्रामधले दोष बाजुला सारून त्याच्यात स्वत:च्या गुणांची भर घालतो व मित्राचं जीवन उजळून काढतो. जो आपल्या मित्राच्या वाटेतले काटे वेचून त्याच्या वाटेत फुलांच्या पायघड्या तयार करतो व त्याच्या पायातले काटे स्वत:च्या हातांनी बाजुला काढतो तोच खरा दिलदार मित्र होय.

       मैत्रीमध्ये रंगीत धुंदी असते. यामध्ये वय, वेळ, समाज कशाचच बंधन रहात नाही.
मैत्री असते स्वच्छ निर्मळ पाण्यासारखी
पौर्णिमेच्या लख्ख चंद्रासारखी
त्या इवल्याशा पणतीच्या इवल्या वातीसारखी
कृष्णाच्या प्राणप्रिय राधेसारखी
व वनवासातही सोबत करणार्‍या सीतेसारखी.
            मैत्रीतही अनेक प्रकार असतात, जसे काहीतरी हेतू ठेवून केलेली मैत्री, समोर आहे म्हणून झालेली मैत्री आणि भावनिकरित्या आपणहून नकळत झालेली मैत्री. नकळत झालेली मैत्री असते तिच खरी मैत्री होय. खरच आपण आई-वडिलांशी जितकं समरस होऊन बोलू शकत नाही तितकं आपल्या मित्रांशी बोलतो. मग ही एक अद्वितीय शक्ती मानायला काहीच हरकत नाही.
          मैत्रीत कशाचही बंधन नसतं ती एक मुक्त मोरणीप्रमाणे आपल्या मोराला (मित्राला) साद घालत असते. मग तो मित्र मुलगा,, मुलगी,, आई,, प्राणी,, पक्षी कुणीही असू शकतं. मैत्रीमध्ये फक्त भावना महत्त्वाच्या असतात. मैत्री संगतीत जितकी फुलते, बहरते तितकीच ती विरहात तीव्रतेने जाणवते तिचं महत्त्व कळतं आणि तिची आवश्यकता जाणवू लागते.मैत्री स्वच्छ आहे तितकीच ती स्वतंत्र आहे. ज्यावेळी हा/ही माझा मित्र आहे हे सांगताना आपली जीभ थरथरत नाही किंवा आपण अडखळत नाही, जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राची ओळख छातीठोकपणे करुन देऊ शकता तेव्हा तुमची निखळ व सच्ची मैत्री आहे असं मानायला कुठल्याही पुराव्याची किंवा वारश्याची गरज तुम्हाला भासणार नाही.
          प्रत्येक नात्याला एक संकल्पना एक विशिष्ट साचा असतो तसा मैत्रीला नसतो. मैत्रीची व्याप्तीच एवढी मोठी आहे की तिला तोलणं किंवा मोजणं शक्यच नाही. प्रत्येक नात्याला रक्ताची ओळख सांगावी लागते म्हणजे समजा भावाचं नात सांगण्यासाठी वडिलांचं नाव पण मैत्री हे जगातलं एकमेव असं नातं आहे ज्याला आणि रक्ताची ओळख सांगावी लागते पण मैत्री हे जगातलं एकमेव असं नातं आहे ज्याला रक्ताची काहीच गरज नाही व हे नातं कुणाकडून उधार घेता येत नाही व वारसाहक्कानेही मिळत नाही त्यामुळे ते निप:क्ष, स्वच्छ जलाशयाप्रमाणे चकाकत राहतं.
          मैत्रीत एकटेपणा घालवण्याची, आनंदी ठेवण्याची क्षमता खुपच संस्मरणीय वाटते. आपल्या मित्रापासून दूर गेल्यानंतर आपण आपल्या मित्राला सतत आठवतो त्याची उणीव क्षणाक्षणाला जाणवायला लागते तेव्हा आपल्याला आपोआप आपल्या मैत्रीतली दृढता समजते व जेव्हा ती समजते तेव्हा आपण खर्‍या अर्थाने मित्र म्हणून मिरवण्यास पात्र ठरतो.रुपेरी वाळूमध्ये स्वच्छ कोजागिरीच्या आनंददायी रात्री जे प्रसन्न मोहक वातावरण असतं तसा अनुभव मित्राला मित्राच्या मैत्रीमध्ये जाणवतो. ते मित्र नेहमीच एकमेकांच्या सहवासात राहण्यास आतुरतात व जोशात येऊन धुंद होऊन जनमताची, जात-पात, धर्म यांची पर्वा न करता बेफामपणे मैत्रीच्या सुरात गात सुटतात, “ये दोस्ती हम नही तोडेंगेपण खरं तर दोस्ती तुटायची नाही हे म्हणताना ते विसरतात की तुटते ती मैत्री नसतेच शेवटी मैत्री म्हणजे अखंडता, अतुटता यांचा बंध आहे.


मैत्री म्हणजे नाव असतं, स्वत:मध्ये गजबजलेलं गाव असतं
मैत्री म्हणजे सदृढ स्वच्छ काया, जी मित्रावर करते आईप्रमाणे माया
मैत्री म्हणजे असते एक जागागुंतला जाते मित्राचा त्यामध्ये धागा



Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj