KARAMBALI GRAMPANCHAYAT

करंबळी ग्रामपंचायत
करंबळी हे गाव कोल्हापूर  जिल्ह्यातील गडहिंग्लज या तालुक्याच्या ठिकाणापासून 10 कि.मी.अंतरावर सह्याद्रीच्या दिशेने निसर्गरम्य अशा ठिकाणी एका टेकडीवर वसले आहे.मेन रोडपासून आत येताना एक सुंदर छान बंधारा आपले स्वागत करतो. तो एका लहानश्या ओढ्यावर बांधला आहे. तेथे गावाची पांढर म्हणून ओळखली जाणारी “ मंगाई ” या देवीचे छोटेसे मंदिर आहे. तेथून पुढे आत जाताना दोन्ही बाजूंना हिरव्यागार झाडांना नटलेल्या अशा वाटेवरून आपण करंबळी मध्ये पोहचतो.

करंबळी ग्रामपंचायत ही सन 1952 पासून कार्यरत असून सदस्य संख्या अकरा आहे. तसेच दर चार वर्षांनी पंचायत निवडणुका लढवली जाते व गावचा कारभार पाहण्यासाठी, गावचा विकास करण्यासाठी गावचा  प्रथम नागरिक म्हणून सरपंचांची नेमणूक केली जाते. सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.
कार्यकारी मंडळ
सरपंच
सौ. मालुताई सुभाष इंगळे 

उपसरपंच
श्री. नारायण कृष्णा माळी 

ग्रामसेवक
श्री. श्रीकांत अनंत सोनार

सदस्य
सौ. मालुताई सुभाष इंगळे
श्री. नारायण कृष्णा माली
श्री. तानाजी विश्राम चौगले
श्री. मोहन दिलीप मोटे
श्री. किसन भिमराव माळी  
श्री. सुरेश मारुती माळी
सौ. सुवर्णा नारायण पाटील
सौ. सरिता श्रीपती पन्हाळकर
सौ. सिमा बाबासो कांबळे
सौ. गिता कृष्णा माळी
सौ. रेखा बाबुराव शेरेकर 

गावामध्ये वैशिष्यपूर्ण राबवलेल्या योजना :- 
  • दि1जुलै रोजी करणेत आलेल्या 2 कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत गावामध्ये ग्रामपंचायतीने रस्त्याच्या दुतर्फा 200 वृक्षांची लागवड करण्यात आली.
  • प्लॅस्टिक बंदी करणेसाठी ग्रामपंचायत मार्फत कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करणेत आले.
  • धूर मुक्त गाव योजनेखाली दारिद्र्यरेषेखालील लोकांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले.

गावाला मिळालेले विविध पुरस्कार :- 
  • तंटामुक्त पुरस्कार
  • निर्मल ग्राम पुरस्कार
  • स्वच्छता पुरस्कार हगणदारी मुक्त गाव.




संपर्क साधा :
करंबळी ग्रामपंचायत
मु.पो.- करंबळी
तालुका - गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर
महाराष्ट्र 416526
फोन नंबर : 02327 – 244123 , 7588467222 
Karambali.Website http://karambali.gadhinglaj.org/
           

Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj