JARALI GRAMPANCHAYAT

जरळी ग्रामपंचायत :
महाराष्ट्रा मधील कोल्हापूर  जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामध्ये नदी काटी निसर्गरम्य सौंदर्यात वसलेले एक लहानसे खेडे म्हणजे जरळी हे गाव . या गावाच्या ग्रामपंचायतीची स्थापना 3 मार्च 1938 रोजी झाली. गावामध्‍ये सार्वजनिक विहीर उपलब्‍ध आहेत. तसेच गावातील लोकांनी बोरवेल देखील खोदले आहेत. या पाण्याचा वापर शेतीसिंचनासाठी व पिण्यासाठी होतो. जरळी गावामध्ये रस्ते दुरूस्ती करणे, दिवाबत्तीची सोय करणे, गटार बाधणे, इ. कामाची अंमलबजावणी ग्रामपंचायती मार्फत केली जाते.

कार्यकारी मंडळ : 
सरपंच

सौ. महादेवी मळाप्पा मगसुळे 

उपसरपंच

श्री. पुंडलिक मळाप्पा दुंडगे

ग्रामसेवक

श्री. मारुती अर्जुन नागरे

सदस्य -
श्री. आप्पासाहेब बाबुराव जाधव  
श्री. अरुण तानाजी सोनार
श्री. श्रीकांत महादेव शिंदे
श्री. गणपती शिवाप्पा नाईक
सौ. गौरी उमेश लोंढे
सौ. पूजा शिवाजी बागडी
सौ. सुवर्णा सिदाम धनगर
सौ. उज्वला मळाप्पा नावलगी
सौ. रेणुका संतराम कांबळे 

गावामध्ये वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना :   
  • निर्मल ग्रामयोजना
  • प्लॅस्टिक बंदी 
  • वृक्षारोपण
  • कृषी कार्यक्रम अंतर्गत कृषी विभाग गडहिंग्लज येथील अधिकाऱ्यांना बोलवून पिकावरील कीड तसेच हवामान अंदाजानुसार पेरणी संदर्भात माहिती दिली. 
गावास मिळालेले विविध पुरस्कार :
  • महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार
  • पर्यावरण पुरस्कार
  • संतगाडगे बाबा पुरस्कार

संपर्क साधा : 
जरळी ग्रामपंचायत
पत्ता : मु.पो. जरळी
तालुका - गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर
महाराष्ट्र 416551
फोन नंबर : 02327 –278183, 9881938585
Jarali Website
http://jarali.gadhinglaj.org/

Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj