HEBBAL KASABA NOOL GRAMPANCHAYAT.

हेब्बाळ कसबा नूल ग्रामपंचायत
मौजे हेब्बाळ कII नूल हे गडहिंग्लज तालुक्यातील एक छोटंसं गाव. गावात ग्रामपंचायत प्रथम 1952 साली अस्तित्वात आली. ग्रामपंचायत गावात झाल्यानंतर गावात खूप बदल दिसून आले. गावात ग्रामपंचायतीच्या तसेच गावातील लोकांच्या मदतीने गावात स्वच्छता मोहीम राबवली गेली. तसेच गाव  तंटामुक्त करण्यासाठी प्रयत्न चालु आहेत. गावात अंतर्गत गटारींचे बांधकाम चांगल्या पध्द्तीने केले आहे. गावात रात्रीचा अंधार कमी करण्यासाठी स्ट्रेट लाईट बसविलेले आहेत. ग्रामपंचायतीमार्फत सुरळीत पाणीपुरवठा, ग्रामस्वच्छता, वृक्षलागवड इ. कार्ये चालू आहेत. 
हेब्बाळ कII नूल ग्रामपंचायत ही 1952 सालापासून  कार्यरत असून सदस्य संख्या दहा आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. आमच्या गावातील कुटुंबांची संख्या 666 असून गावाची लोकसंख्या 4336 इतकी असून ती 4 वॅार्ड मध्ये विभागली गेली आहे. 

कार्यकारी मंडळ
सरपंच
श्री. नागाप्पा आई गौरव्वा शिंगे 

उपसरपंच
श्री. शिवानंद विरपाक्ष गणाचार्य 

ग्रामसेवक
श्री. दत्ता कृष्णा पाटील

सदस्य
श्री. अरुण बाळाप्पा मिरजे
श्री. प्रवीण संभाजीराव शिंदे
श्री. आप्पासाहेब बाळाप्पा कल्याणी 
सौ. मालू भूपाल कांबळे
सौ. राजश्री राजेंद्र जमगी
सौ. महादेवी संतोष राऊत
सौ. रेखा सुखदेव पोवाडे
सौ. सरोजीनी मलाप्पा चिन्नानावर

गावामध्ये वैशिष्यपूर्ण राबवलेल्या योजना :- 
  • वृक्षारोपण कार्यक्रम
  • स्वच्छता अभियान
  • गावच्या विकासात्मक कामाबाबत जनजागृती रॅली

गावाला मिळालेले विविध पुरस्कार :- 
  • पर्यावरण समृध्द ग्राम अभियान बक्षिस



संपर्क साधा :
हेब्बाळ कसबा नूल ग्रामपंचायत
मु.पो.- हेब्बाळ कसबा नूल
तालुका - गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर
महाराष्ट्र 416501
फोन नंबर : 02327 – 268571 , 9420353028
Hebbalkasabanool.Website
http://hebbalkasabanool.gadhinglaj.org/

Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj