TAWREWADI GRAMPANCHAYAT

तावरेवाडी ग्रामपंचायत -
तावरेवाडी हे गाव कोल्‍हापूर जिल्‍हामधील गडहिंग्‍लज तालुकामधील छोटे पण सुंदर व निसर्गाने नटलेले गाव आहे. आमच्या गावाच्या शेजारूण घटप्रभा नदी वाहते गावास विविध पुरस्‍काराने सन्‍मानित करणेत आले आहे . जसे भारत सरकारचा निर्मल ग्राम पुरस्‍कार प्राप्‍त झालेला आहे. आमच्या गावास तंटामुक्‍त पुरस्‍काराने सन्‍मानित करणेत आले आहे.गावामध्‍ये प्‍लॉस्‍टीक बंदीसाठी कापडी पिशवी सर्व कुटुंबाना वाटप केलेली आहे. तसेच गावामध्ये कचराकुंड्या ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे घनकचरा एकत्रित साठविला जातो. त्‍यामुळे गावामध्‍ये स्‍वच्‍छता राहण्‍यास मदत होते. गावामध्‍ये मृदा जलसंधारणाची कामे केलेली आहेत.गावाला पर्यावरण विकास रत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे.
तावरेवाडी ग्रामपंचायत ही सन 1989 पासून कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंचउपसरपंचसदस्यग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. निर्मल ग्राम पुरस्कार, तंटामुक्त पुरस्कार, पर्यावरण विकास रत्न पुरस्कार  हे पुरस्कार मिळाले आहेत.
कार्यकारी मंडळ :
सरपंच -
सौ. भारती नारायण मनगुतकर

उपसरपंच -
श्री. बजरंग लक्ष्मण पाटील

सदस्य -
सौ. अनुबाई गोविदा मनगुतकर
श्री. जनार्दन लक्ष्मण सुतार
श्री. पुंडलिक गंगाराम मनगुतकर
सौ. सुनिता बाबू बसाण
श्रीमती इंदुबाई लक्ष्मण सुतार 

ग्रामसेवक -
श्री. हनुमान बापुराव राऊत

गावामध्ये वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना :
  • गावात वृक्षलागवड करणेत आली.
  • एक गाव एक गणपती योजना.
  • गावात प्लास्टिक बंदीसाठी कापडी पिशवी सर्व कुटुंबाना वाटप.
  • मंडळामार्फत शाळेतील मुलांना शालेय वस्तूचे वाटप.
  • सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता मोहीम राबविणेत आली.


गावास मिळालेले विविध पुरस्कार :
  • निर्मल ग्राम पुरस्कार
  • तंटामुक्त पुरस्कार
  • पर्यावरण विकास रत्न पुरस्कार 


संपर्क साधा :
तावरेवाडी ग्रामपंचायत
पत्ता : मु.पो. तावरेवाडी
तालुका- गडहिंग्लज, जिल्हा – कोल्हापूर
महाराष्ट्र 416504
फोन नंबर : 9637126924

Tawrewadi Website
http://tawrewadi.gadhinglaj.org/

Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj