NESARI GRAMPANCHAYAT

नेसरी ग्रामपंचायत :

महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील घटप्रभा नदीच्या काठी वसलेले आमचे गाव म्हणजे नेसरी . नेसरी या आमच्या गावाकडे ग्रामीण भागातील विकसित झालेलं गाव म्हणून पहिल जात. तसेच आठवड्यातील दर गुरुवारी बाजार भरतो आसपासच्या 10 ते 12 खेड्यातील ग्रामीण माणसे या बाजारात काही वस्तूंची खरेदी व विक्री करण्यासाठी येतात. येथे प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा व कॉलेजस आहेत. याचा लाभ आसपासच्या खेड्यातून शिकण्यासाठी येणाऱ्या मुला-मुलीना होतो.

नेसरी ग्रामपंचायत ही सन 1927 पासून कार्यरत असून सदस्य संख्या पंधरा आहे. सरपंचउपसरपंचसदस्यग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायतीस आदर्श ग्राम पुरस्कारतंटामुक्त गाव पुरस्कार व दलित वस्ती सुधार पुरस्कार  यासारखे विविध पुरस्कार मिळालेले आहेत.



कार्यकारी मंडळ :
सरपंच -
सौ.वैशाली शिवाजी पाटील
उपसरपंच -
श्री.दयानंद शंकर नाईक


सदस्य -
श्री.परसू केरबा नाईक
श्री.अमर मल्लिकार्जुन हिडदुगी
श्री.संतोष आप्पा सुतार
श्री.रामचंद्र विठोबा सपाटे
सौ.अंजना शरद साखरे
श्री.प्रशांत उर्फ परशराम विठोबा नाईक
सौ.ताहिरा हसन अल्ली (खाजू) ताशिलदार
सौ.राजियाबी साहेबलाल मुजावर
सौ.साहेरा सिकंदर वाटंगी
सौ.मालुताई दतात्रय गुरव
सौ.सीमा देवेंद्र कांबळे
सौ.अनिता यशंवत मटकर
श्री.अशोक महादेव पांडव 

ग्रामसेवक -
श्री.ए.व्ही.हसवे

ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना :

  • ग्राम स्वच्छता अभियान
  • वृक्षारोपण कार्यक्रम
  • सी.सी.टिव्ही
  • मोफत वृक्ष वाटप
  • कृषी उपक्रम
  • कापडी पिशवी वाटप
  • गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप
  • स्वच्छता मोहिम इ.



 
ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार :
  • दलित वस्ती सुधार पुरस्कार
  • निर्मल ग्राम पुरस्कार
  • संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान
  • आदर्श ग्राम पुरस्कार
  • तंटामुक्त पुरस्कार





संपर्क साधा :
नेसरी ग्रामपंचायत
पत्ता : मु.पो. नेसरी
तालुका- गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर
महाराष्ट्र 416504फोन नंबर : 9860039078, 9766770894.

Popular posts from this blog

Dongari certificate

Senapati Prataprao Gujar Smarak

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj