NANDANWAD GRAMPANCHAYAT

नंदनवाड ग्रामपंचायत :
नंदनवाड हे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्वेस कर्नाटकच्या सिमालागत वसलेले एक छोटेसे गाव आहे. या गावची ग्रामपंचायत 1975 सालापासून कार्यरत आहे. आजपर्यंत ग्रामपंचायतीने गावात शासनाचे विविध उपक्रम आणले. व त्यातून ग्रामपंचायतीला विविध पुरस्कारदेखील मिळाले आहेत. नंदनवाड ग्रामपंचायतीने गावात स्वच्छता मोहीम राबवली व त्यातून गावाला एक वेगळेच स्वरूप मिळाले आहे. नंदनवाड या गावातील लोकांना कन्नड व मराठी अतिशय उत्तम बोलता येते. गावातील लोक अतिशय प्रेमळ व बंधुभावाने एकत्र राहतात.
नंदनवाड ग्रामपंचायत ही 1975 सालापासून  कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंचउपसरपंचसदस्यग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. आमच्या गावातील कुटुंबांची संख्या 359 असून गावाची लोकसंख्या 1468 इतकी असून ती 3 वॅार्ड मध्ये  विभागली गेली आहे. 

सरपंच -
सौ. दुंडवा शामराव सलामवाडे 

उपसरपंच -
श्री. श्रीमंत बसाप्पा पुजारी

सदस्य -
श्री. बसवराज रामचंद्र सुतार
श्री. शिवाजी शिवाप्पा कापसे
सौ. शिला रमेश देसाई 
सौ. शेवंता लक्ष्मण पाटील
सौ. शोभा भिमगोंडा तेरणी 

ग्रामसेवक -
श्री.एस.जी.पाटील

गावामध्ये वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना
  • गावातील मंदिरांची साफसफाई करून रंगरंगोटी केली.
  • गावात सार्वजनिक सफाई करण्यात आली.
  • प्राथमिक शाळा सफाई करून रंगरंगोटी केली.
  • गरीब विद्यार्थ्यांना गावातील प्रतिष्ठीत नागरिकांच्या कडून वह्या पेन वाटप केले आहे.
  • 2015-16 साली गावात दुष्काळामुळे पाणी टंचाई निर्माण झाली त्यावेळी सामुदायिक सभा घेऊन गावातील शेतकऱ्यांनी नवीन ऊस लागण न करता आपल्या विहिरीतील पाणी गावासाठी वापरण्यास दिले.

गावास मिळालेले विविध पुरस्कार :
  • सन 2007-08 साली हागणदारीमुक्त पुरस्कार प्राप्त.
  • सन 2012-13 साली तंटामुक्त पुरस्कार प्राप्त. 






संपर्क साधा : 
नंदनवाड ग्रामपंचायत
पत्ता : मु.पो. नंदनवाड
तालुका - गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर
महाराष्ट्र 416506
फोन नंबर : 02327 – 264745 , 7507048099
Nandanwad Website:
http://nandanwad.gadhinglaj.org/

Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj