MUTNAL GRAMPANCHAYAT

मुत्नाळ ग्रामपंचायत :-
महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामधील,गडहिंग्लज तालुक्यातील मुत्नाळ हे गाव आहे. मुत्नाळ गावाचे क्षेत्रफळ गावठाण क्षेत्र 8104 हेक्टर्स, बागायत क्षेत्र 185.87 हेक्टर्स, तर जिरायती कृषी क्षेत्र 180 हेक्टर् इतके आहे. गावाकडील दक्षिणेकडे हिरण्‍यकेशी नदी  आहे. गावामध्‍ये राष्‍टीय पेयजल योजना चालु आहे. त्‍यामुळे  पिण्‍याच्‍या पण्‍याची समस्‍या काही प्रमाणात  कमी झाली आहे. गावामध्‍ये सार्वजनिक विहीर  हातपंपदेखील उपलब्‍ध आहेत. गावामध्‍ये जॅकवेल बांधलेले आहे. पाण्याचा वापर शेतीसिंचनासाठी व पिण्यासाठी होतो. मुत्नाळ गावामध्ये ग्रामपंचायत असून ग्रामपंचायत मार्फत विविध कामाची अमलबजावणी होते. उदा. रस्ते दुरूस्ती करणे,दिवाबत्तीची सोय करणे,गटार बाधणे, इ. ग्रामपंचायतीने म.ग्रा.रो.ह.योजनेतून रस्‍त्‍याच्‍या दुर्तफा बाजुस झाडे लावलेली आहेत. तसेच ग्रामपंचायतीने जंगली ५००० झाडांची लागवड केलेली आहे. ग्रामपंचायतीमार्फत संवर्धनासाठी कर्मचारी ठेवण्यात आला आहे.
मुत्नाळ ग्रामपंचायत ही सन 29/09/1938 पासून कार्यरत असून सदस्य संख्या दहा  आहे. सरपंचउपसरपंचसदस्यग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायतीस तंटामुक्त पुरस्‍काराने सन्‍मानित करणेत आले आहे.

कार्यकारी मंडळ -
सरपंच -
सौ. माधवी मार्तंड जरळी
उपसरपंच -
श्री. सुर्याजी रामा नाईक
सदस्य -
श्री. अरुण इरगोंडा पाटील
सौ. छाया केंपन्ना नाईक
सौ. दिपा संताजी नाईक
सौ. सुरेखा केंपन्ना हट्टी
सौ. लक्ष्मी सुरेश मोकाशी
सौ. रंजना लक्ष्मण कोळी
श्री. बापू सुबराव कांबळे
श्री. केंपन्ना व्यंकाप्पा जाधव 
ग्रामसेवक -
श्री. संजीव शंकरराव डवरी 
ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना :
  • गावामध्‍ये प्लॅस्टीक तसेच गुटका बंदी केलेली आहे.
  • गावाच्‍या बाहेर स्‍मशान शेडच्‍या जवळ घनकचरा एकत्रित साठविला जातो.
  • गावामध्‍ये मृदा जलसंधारणाची कामे केलेली आहेत.
ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार :

  • तंटामुक्त पुरस्‍कार

संपर्क साधा:
मुत्‍नाळ ग्रामपंचायत
पत्ता : मु.पो. मुत्‍नाळ
तालुका- गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर
महाराष्ट्र 416501
फोन नंबर : 02327 – 268823
   
Mutnal Website
http://mutnal.gadhinglaj.org

Popular posts from this blog

Dongari certificate

Senapati Prataprao Gujar Smarak

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj