KADGAON GRAMPANCHAYAT

कडगांव ग्रामपंचायत :
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यापासून अगदी चार किलोमीटर अंतरावर कडगांव हे गाव वसले आहे. या गावाचे ग्रामदैवत जोतिर्लिंग या देवाचे गावात भव्य असे मंदिर उभारण्यात आले आहे. ग्रामपंचायतीमार्फत गावातील लोकांना वेगवेगळ्या योजनांची माहिती देवून त्या योजनांचा लाभ घेण्याचे सांगितले जाते. तसेच गावाला सन 1998-99 मध्ये ग्राम अभियानामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यात व्दितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. याचबरोबर ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्‍वच्‍छतावृक्ष लागवडपाणीपुरवठा जन्‍म-मृत्‍यु नोंदविवाह नोंद इ. कार्य केली जातात. ग्रामपंचायती मार्फत ऑनलाईन ग्रामीण सुविधा दिल्‍या जातात.
कडगांव ग्रामपंचायत ही 1939 सालापासून  कार्यरत असून सदस्य संख्या तेरा आहे. सरपंचउपसरपंचसदस्यग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. आमच्या गावातील कुटुंबांची संख्या 1,310 असून गावाची लोकसंख्या 5,810 इतकी आहे. तसेच ती 5  वॅार्ड मध्ये विभागली गेली आहे.

कार्यकारी मंडळ : 
सरपंच
सौ. सिमा रमेश गोंधळी 

उपसरपंच
श्री. नवज्योत बाळासो देसाई

ग्रामसेवक


श्री. कृष्णा तुकाराम सिताप 

सदस्य -
श्री. नेताजी पांडुरंग पाटील
श्री. विक्रम विश्वास पाटील
श्री. सदानंद गुरुपाद्या स्वामी
श्री. राजेंद्र सदाशिव डवरी
श्री. अमर श्रीपती पाटील
सौ. लक्ष्मीबाई दत्तात्रय मोरे
सौ. सोनाबाई दत्तात्रय माटले
सौ. किशोरी विजय शिंदे
सौ. छाया संजय पाटील
सौ. भारती अनिल लोहार
सौ. सखुबाई बंडू कांबळे 

गावामध्ये वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना :
  • गावामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम केला आहे.
  • मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप केले आहे. 

गावास मिळालेले विविध पुरस्कार :
  • पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना पुरस्कार 201011
  • निर्मल ग्राम पुरस्कार सन 2009 

  


संपर्क साधा :
कडगांव ग्रामपंचायत
पत्ता : मु.पो. कडगांव
तालुका - गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर
महाराष्ट्र 416502
फोन नंबर : 02327 –278183, 9881938585
Kadgaon Website
http://kadgaon.gadhinglaj.org/
http://kadgaon.gadhinglaj.org/




Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj