HEBBAL JALDYAL GRAMPANCHAYAT

हेब्बाळ जलद्याळ  ग्रामपंचायत :

गडहिंग्लज तालुक्याच्या अग्नेयेला असलेले डोंगरराजींच्या कुशीत वसलेले तसेच कर्नाटक – महाराष्ट्राचा दुभाजक असलेले एक छानसं टुमदार गाव म्हणजे हेब्बाळ जलद्याळ. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात सहभागी झालेले व पुरस्कार मिळवलेले गाव आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावाला लाभलेले आतापर्यंतचे सरपंच. 1957 साली पहिल्यांदा या गावात ग्रामपंचायत अस्तित्वात आली. या गावाचे पहिले सरपंच म्हणून मा.कै.सुबराव भागोजी पाटील यांची निवड झाली. व गावाला एक वेगळेच स्वरूप प्राप्त झाले. गावात निरनिराळ्या विकासाच्या योजना आल्या. याच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने गावात विकासाला सुरुवात केली ती आजतागायत सुरु आहे. गावाच्या ग्रामपंचायतीला आजपर्यंत विविध पुरस्कार मिळाले आहेत.

हेब्बाळ जलद्याळ ग्रामपंचायत ही 1957 सालापासून कार्यरत असून सदस्य संख्या नऊ आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. आमच्या गावातील कुटुंबांची संख्या 489 असून गावाची लोकसंख्या 1643 इतकी आहे. असून ती 3 वॅार्ड मध्ये विभागली गेली आहे.



कार्यकारी मंडळ :
सरपंच -
श्री. अरविंद शंकर दावणे 

उपसरपंच -
सौ. सुनिता रामू नाईक

सदस्य -
श्री. सचिन जोतीबा गुरव
सौ. अश्विनी नितीन सुतार
श्री. सागर जनबा दळवी 
सौ. साधना शशिकांत करंबळकर
सौ. सुनिता रविंद्र कांबळे
सौ. सुरेखा रणजित पाटील
श्री. शंकर राजाराम करंबळकर 

ग्रामसेवक -
श्री. सुरेश राजाराम गुरव 

ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना :

  • शेतीसाठी ग्राम ग्रामपंचायतमार्फत एरिगेशन राबविणे.
  • ठिबक सिंचन आणि तुषार जलसिंचन योजना राबवणे.
  • बोअरवेल पुनर्भरण योजना राबविणे.
  • तलाव बांधणे व भूजल पातळी वाढविणे.
  • शेताकडे जाणेसाठी रस्ते तयार करणे.
  • शेतीसाठी न.पा.पु.योजनेसाठी पवनचक्की द्वारे विद्युत निर्मिती करणे.
  • शेतीमाल प्रक्रिया व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तयार करणे.
  • घनकचरा निर्मुलन व्यवस्था
  • आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखाना
  • सांडपाणी व्यवस्थेसाठी RCC गटर्स बांधणे.
  • गाव अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे.
  • सामाजिक सभागृह बांधणे.
  • ऐतिहासिक बुरुज देखभाल दुरुस्ती करणे.
  • शेतीसाठी सोलर कंपाऊंड बांधणे.
  • शेततळी बांधणे,
  • गावच्या बाहेरून बायपास रस्ते काढणे.
  • गावचा सिटी सर्वे करून आधुनिक पद्धतीने घर, रस्ता, गटर्स व लाईटची सुविधा करणे.
  • पवन उर्जेवर गावची विद्युत वितरण व्यवस्था करणे.
  • देवालयांचा जीर्णोद्धार करणे.
  • शिवकालीन पाणी साठवणे योजनेतून गावातील सर्व घरावरील पाणी साठवणे.
  • सरपंच मानधनातून स्वयंचलित मनोरा घड्याळ.
  • लोकवर्गणीतून स्वयंचलित चालू बंद रस्त्यावरील दिवे.
  • विद्यामंदिर येथे लोकवर्गणीतून ई.प्रशाला प्रोजेक्ट.
  • ग्रामपंचायतमध्ये लोकवर्गणीतून सी.सी.टीव्ही कॅमेरे.
  • श्रमदानातून व लोकवर्गणीतून बंधाऱ्यातील गाळ काढणे.
  • राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र सुरु.
  • लोकवर्गणी व श्रमदानातून लिंगनूरकडे जाणारा रस्ता (प्रा.शाळा) पासून ते कर्नाटक सीमे पर्यंतचा (बायपास)रस्ता झाडे झुडपे काढून मजबुतीकरण करणेत आला आहे.  
  • ग्रामनिधीतून सार्वजनिक प्रयोजनाकरिता 6 गुंठे गावठाणातील जागा, न.पा.पु.योजना व जलशुद्धीकरिता 5 गुंठे व जाकवेल करिता 2 गुंठे जागा खरेदी.



 ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार :
  • जिल्ह्यात अस्पृश्यता निवारण प्रथम क्रमांक सन 1957
  • जिल्ह्यात पहिला ग्रामगौरव सन 1962
  • महाराष्ट्र शासनाकडून महात्मा गांधी जन्म शताब्दी निमित्य प्रथम पारितोषिक सन
  • 1969 – 70
  • आदर्श गाव म्हणून तालुक्यात प्रथम क्रमांक सन 1969 – 70
  • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तालुक्यात द्वितीय क्रमांक सन 2000-01
  • जिल्हापरिषदेचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार श्री. बी.ए.खवरे यांना सन 2003-04
  • जिल्ह्यात अस्पृश्यता निवारण आदर्श गांव प्रथम क्रमांक सन 2003-04
  • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तालुक्यात प्रथम क्रमांक सन 2003-04
  • जिल्हापरिषदेकडून तालुक्यात प्रथम यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार सन 2003-04
  • जिल्हापरिषदेकडून तालुक्यात प्रथम यशवंत सरपंच पुरस्कार श्री. अरविंद शंकर दावणे यांना सन 2004-05
  • केंद्र शासनाचा तालुक्यात प्रथम निर्मल ग्राम पुरस्कार सन 2004-05
  • संपूर्ण स्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हापरिषदेचा तालुक्यातून प्रथम क्रमांक सौ. गीता अरविंद दावणे यांना सन 2007-08
  • महात्मा गांधी तंटामुक्त गाव विशेष पुरस्कार सन 2009 -10
  • जिल्हापरिषदेकडून तालुक्यात प्रथम यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार सन 2013-14
  • जिल्हापरिषदेकडून तालुक्यात प्रथम यशवंत सरपंच पुरस्कार सौ.सुप्रिया विजय गुरव यांना सन 2013-14
  • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तालुक्यात प्रथम क्रमांक सन 2015-16
  • स्वच्छ सुंदर हिरवी शाळा तालुक्यात प्रथम क्रमांक सन 2015-16
  • सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक अंगणवाडी क्रमांक 91 सन 2015-16
  • शाहू, फुले, आंबेडकर दलितवस्ती स्वच्छता अभियान तालुक्यात तृतीय सन 2015-16
  • संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्ह्यात प्रथम क्रमांक सन 2015-16


संपर्क साधा :
हेब्बाळ-जलद्याळ ग्रामपंचायत
पत्ता : मु.पो. हेब्बाळ-जलद्याळ
तालुका - गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर
महाराष्ट्र 416503
फोन नंबर : 02327 – 239165 , 7588940733
HebbalJaldyal Website
http://hebbaljaldyal.gadhinglaj.org
HebbalJaldyal Android App Download Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.hebbal.grampanchayat



Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj