माजी विद्यार्थी मेळावा, विद्या मंदिर सुळे
II शिक्षण सेवा आणि त्याग II
विद्या मंदिर, सुळे
ता. आजरा, जि.कोल्हापूर
माजी विद्यार्थी मेळावा
स.न.वि.वि.
महोदय / महोदया,
आपण आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहात.याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
आपल्यासारख्या विद्यार्थ्यांच्या कर्तुत्वावरच शाळेची पताका वेगवेगळ्या क्षेत्रात डौलाने फडकत आहे. या शाळेने आपल्या पंखात बळ भरण्याचे काम केले आहे. त्यामुळेच तर आपण आपल्या कर्तुत्वाचा आलेख सदैव उंचावत ठेवला आहे. आपण या शाळेविषयी निश्चितच कृतज्ञ आहात.आपल्या या कर्तुत्वाची व नेतृत्वाची ओळख सर्व माजी विद्यार्थ्यांना व्हावी,
आपल्या शाळेशी असलेला जिव्हाळा वृध्दिंगत व्हावा, आपल्या पश्चात शाळेने केलेली चौफेर प्रगती आपल्या पर्यंत पोहोचवून भविष्यातील वाटचालीसाठी आपले मार्गदर्शन आम्हा सर्वाना व्हावे,वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा परस्पर स्नेह वाढीस लागावा या पवित्र हेतूने रविवारी दि. 8 मे 2016 रोजी सकाळी ठीक 9.00 वा, स्नेहमेळावा आयोजित केला आहे. आपण निश्चितच येणार याचा आम्हाला विश्वास आहे.तो सार्थ ठरणेसाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.आपले गुरु व बालपणीच्या सवंगडयांना भेटायला आवर्जून या.
---''स्वागतोत्सुक" ----
सौ.शीलाताई म. सुतार (सरपंच)
श्री. नामदेव जो. कोले ( मुख्याध्यापक)
श्री. काशिनाथ प. कटाळे ( अध्यक्ष)
ग्रामपंचायत, सुळे
विद्या मंदिर, सुळे
शाळा व्यवस्थापन समिती, सुळे
---------------------