Late Hon. Dr.S.S.Ghali
स्व. डॉ. एस्. एस्. घाळी :
साहेबांचे संपूर्ण नाव शिवलिंग शिवयोगी घाळी असे असून डॉक्टर घाळीसाहेब म्हणूनच त्याना सर्व गडहिंग्लज तालुका ओळखत असे. डॉक्टर घाळीसाहेब म्हणजे सभ्य व सुसंस्कृत राजकारणी त्यामुळेच ते अजातशत्रू राहिले. वैद्यकिय व्यवसाय करतानाच त्यानी गडहिंग्लज नगरपालिकेची निवडणूक लढविली व ते दोन वेळा शहराचे नगाराध्यक्ष झाले. त्यानंतर गडहिंग्लज विधानसभा मतदार संघातून दोन वेळा यश मिळविले. आणीबाणीच्या काळी स्व. इंदिरागांधीच्या नेतृत्वाखाली आय काँग्रेस मधून निवडणूक लढवून यश मिळविणारे पश्चिम महाराष्ट्रातील ते एकमेव आमदार होते.
त्यांच्या कालखंडात गडहिंग्लज तालुक्याचा विकास खूप चांगला झाला. गडहिंग्लज शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून त्यांनी जागृति शाळा व कॉलेज काढले. बि.एड. कॉलेज सुरु केले. आज या शैक्षणिक संकुलात 4000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शिक्षणसंस्थेचा सर्व कारभार त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती रत्नमालादेवी घाळी वाहिनी यशस्वीरीत्या सांभाळताहेत. डॉक्टरसाहेबानी लावलेले रोपटे आज "गगनावेरी" गेलेले दिसते.
एक यशस्वी डॉक्टर, एक यशस्वी राजकारणी व एक शिक्षणमहर्षि अशीच त्यांची ओळख इतिहासात राहील …!