Water management for sugarcane

उसासाठी पाणी व्यवस्थापन :
उस शेतीमध्ये पाणी हा घटक अतिशय महत्वाचा आणि निर्णायक घटक आहे. म्हणून पाण्याचा कार्यक्षम काटेकोरपणे, नियोजनबध्दरीत्या वापर करून कमी पाण्यात जमिनीची सुपीकता आणि एकरी टनेज वाढवले पाहिजे.

उसाला पाणी देण्याच्या पद्धती –
ऊस पिकाला सरीवरंबा, कट वाफे पद्धत, सरी नागमोडी पद्धत सुधारित लांब सरी पद्धत, जोडओळ पट्टा पद्धत, एकसरी पट्टा पद्धत, रुंद सरी पद्धत, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन – रेनगन तुषार सिंचन पद्धत इ. पद्धतीन पाणी दिलं जात.
कालावधी
उसाच्या पिकाला उस उगवेपर्यंत म्हणजे पहिला १.५ महिना १/३ सरी भिजेल एव्हढं, फुट्व्याचा कालावधी १.५ ते ३ महिने अर्धी सरी भिजेल एवढ, कांडी सुटण्याची ते जोमदार वाढीच्या म्हणजे ३ ते १० महिने पाऊन सरी भिजेल एवढं आणि पक्वतेचा कालावधी म्हणजे १० महिने ते ऊस तुटेपर्यंत पूर्ण सरी भिजेल एवढं पाणी द्यावं. हंगामानुसार आणि ऊस पिकाच्या गरजेनुसार लागणीपासून तुटेपर्यंत पाण्याच्या पाळ्यातलं अंतर कमी जास्त कराव.

योग्य पद्धत –
पारंपारिक सरी, कटपध्दत, सरी वरंबा नागमोडी पद्धतीने पाणी देण्यात कोणताच फायदा होत नाही. उत्पादन कमी येत, जमिनी नापीक बनतात, पाणी जास्त लागत, म्हणून पारंपारिक सिंचनाच्या पद्धती बदलून लाम्ब सरी पधतीन पाणी द्यावं. त्याचे अनेक फायदे होतात. रानबांधणीच्या खर्चात बचत, लागवडी खालचं क्षेत्र वाढत, पाणी कमी लागत. हवा – पाणी + अन्नद्रव्याच योग्य संतुलन होत. अंतर मशागत सुलभ आणि कमी खर्चात होते. असे अनेक फायदे होतात.

पट्टा पद्धत ठिबक सिंचनासाठी जास्त उपयुक्त ठरते. तसंच पाटपाण्यासाठी सुद्धा. कारण पहिले ४ महिने ८०% क्षेत्रावर पाण्याचा वापर, तर मोठ्या बांधणीनंतर ४०% क्षेत्रावरच पाण्याचा वापर होतो. १५ ते २०% पाणी कमी लागते. पट्ट्यात आच्छादन केल्यास आणखी पाणी वापर कमी होतो. शिवाय पट्टा पद्धतीचे जे काही इतर फायदे आहेत ते मिळताताच.

एका सरीत पाणी तर दुसरी सरी रिकामी अशा पद्धतीने एक सरी पट्टा पद्धतीने उसाच्या सरीला पाणी दिल असता १५ ते २०% पाणी कमी लागते. रिकाम्या सरीला पट्टा पद्धतीप्रमाणे अंतर पिल घेता येते. पाचटाचं आच्छादन करता येत. उत्पादन कमी पाण्यात जास्त मिळत.

पट्टा पद्धतीने उसाची लागण करून ठिबक – सिंचन द्वारे पाणी देता येते. गरजेइतकंच मुळाजवळ पाणी दिल्याने पाण्यात ४० ते ५०% बचत होते आणि उत्पादनात २५ ते ३०% वाढ होते. याशिवाय द्रवरूप खत ठिबक सिंचनातून दिल्यास खतमात्रेत ३०% बचत होते. उत्पादन मात्र वाढीव मिळत. पिकाच्या गरजेनुसार पाणी दिल्याने जमीन नापीक होत नाही. फक्त गरज असते ठिबक – सिंचन सुरळीत चालण्यासाठी वेळच्यावेळी योग्य ती निगा राखण्याची.


शक्यतो ऊस पिकाला ऊस मोठा झाल्यानंतर साधी तुषार सिंचन पद्धत तितकीशी फायद्याची नाही. पण रेनगन तुषार सिंचन पद्धत फायद्याची ठरली आहे. १ अगर २ रेनगनमध्ये संपूर्ण शेत भिजवता येते. गरजेइतक पाणी देता येत असल्यामुळे पाण्याच अनावश्यक अपव्यय टाळता येतो. पाचटाचे आच्छादन केल असल्यास पाचाट लवकर कुजते. ठिबकपेक्षा खर्च कमी. विद्राव्य खतं देता येतात. ऊस पावसाच्या पाण्यासारखा धुतला जात असल्यानं किडी – रोग कमी येतात.

सुरुसाठी २५०, पूर्व हंगामासाठी २७५ पाण्याची गरज असते. हवामान – जमीनीचा प्रकार, जमिनीची खोली, पिकाच वय इ. वर पाण्याच्या पाळीतील अंतर ठरवावे. पाणी मोजण्यासाठी कटथ्रोट’ फ्लूम या पाणी मोजण्याचा साधनाचा वापर करावा.

ॠतुमानानुसार भारी जमिनीत –
  • पावसाळ्यात २६ दिवसांनी
  • हिवाळ्यात २० दिवसानी
  • उन्हाळ्यात १२ – १३ दिवसांनी
  • मध्यम जमिनीत पावसाळ्यात १८ दिवसांनी
  • हिवाळ्यात १४ दिवसांनी
  • उन्हाळ्यात ९ दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
पाणी कमी पडलतर पाचटाच आच्छादन, केओलिनाचा वापर, पोटॅश २५% जास्त द्यावे,
तणनियंत्रण, पाट स्वच्छ ठेवावेत आणि विशेष म्हणजे मे महिन्यातील पाण्याची उपलब्धता पाहून उसाखाली क्षेत्र घ्यावं.

Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj