Sugarcane Farming Guide
एकरी 100 टन उसासाठी व्यवस्थापन : ऊसाच्या चांगल्या वाढीसाठी मध्यम ते भारी स्वरूपाची जमिन असावी. माती परीक्षण करुन घ्यावे त्यानूसार जमिनीचा प्रकार,सामू व इतर उपलब्ध अन्नद्रव्ये याची तपासणी करून घ्यावी आणि त्यानूसार खतांचे नियोजन करावे. को-86032, को-94012, को-671 इत्यादी जातींचा वापर करावा. ऊस उत्पादन वाढीसाठी शेतक-यांनी आता जातींची निवड, जमिनीची मशागत, योग्य लागवड पद्धत, खत व्यवस्थापन या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उस पिकाच्या लागवड करताना जमिनीचा विचार करणे आता गरजेचे आहे. ऊस पिकास मध्यम, काळी ते भारी उत्तम पाण्याचा निचरा असणारी जमीन योग्य आहे. या पिकाची मुळे 1 ते 1.5 मीटर खोल जातात. मध्यम पोताच्या आणि 60 टक्क्यांपेक्षा जादा जलधारणाशक्ती असणा-या, सामू 6.5 ते 8.5 टक्के, क्षाराचे प्रमाण 0.5 पेक्षा कमी, चुनखडीचे प्रमाण 15 टक्क्यांपेक्षा कमी, तसेच उपलब्ध अन्नद्रव्यांचा साठा भरपूर असावा. पूर्व मशागत व सेंद्रिय खते – प्रथम जमीन खोल, उभी आडवी नांगरावी. नंतर 20 ते 25 टन अथवा 40 ते 50 बैलगाड्या प्रति हेक्टरी शेणखत अगर कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळून द्यावे. सेंद्रिय ख...