निसर्ग मानवाचा सखा, सोबती !
निसर्ग म्हणजे काय ? असा प्रश्न अनेक वेळा मानवी मनात निर्माण होत असतो. पण निसर्ग म्हणजे नेमके काय? असा प्रश्न जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा मला वाटत निसर्ग म्हणजे मानवाचा मित्र, सखा, सोबती आहे. जसे कि अनेक अंगांनी फुलणारा, उमलणारा, मानवी जीवनात उन्मेष भरणारा हा सखा निसर्ग. सतत बदलणारा, बदलवणारा, प्राण्या – पश्यांनी बहरलेला हा सखा निसर्ग, संवेदनांना रिझवणारा, चांगल्या विचारांना चालना देणारा ...फक्त देणारच, काही न मागणारा, हा सखा निसर्ग ! निसर्ग मानवाला जगण्याची उमेद येतो, मन प्रसन्न करण्यासाठी वाऱ्याबरोबर सुगंध पसरवणारा, झाडाझाडांमधून बासरी वाजवणारा, सूर्यकिरणांनी उबदारपणा देणारा आणि चंद्राची शीतलता पसरवणारा हा सखा म्हणजे निसर्ग. त्याचं कौतुक करावं तेवढ थोडंच पाण्याबरोबर वाहणारा आणि पक्ष्यांमधून बोलणारा, स्वत:ची प्रौढी न मिरवता सारं शांतपणे सहज करणारा सखा. इतका चांगला मित्र मिळूनही माणूस स्वत: ला पोरका का समजतो ? तुम्ही निराश झालात, उव्दिग्न झालात तरी तो तुम्हाला शांत करतो कधी कधी...